भ्रमर खुळा
भ्रमर खुळा


रंगीत सुगंधीत फुलांनी
सजलेला तिकडे एक माळा
पण का एकाच फुलामागे
फिरतोय हा भ्रमर खुळा
त्याकडे काय पाहतोय
तू पण भविष्यात मग
तसाच होणार एक दिवस
माझ्या चिमुकल्या बाळा
ते वरती आहे न आकाश
ते पण बेभरवशाचा म्हणू
सकाळी नारंगी दुपारी निळा
आणि रात्री रंग होतो काळा
सुसाट बेधुंद वारा मग
पडतील पावसाच्या धारा
येईल मोर नाचेल मग
फुलवून आपला पिसारा
तुझ्यासारखे आले गेले
कित्येक न कळले कुणाला
हा हा साराच आज आहे
उद्या नाही व्यर्थ हा पसारा
तू एका भ्रमरासारखा
जगतोय रे ती डोळ्यावरची
पट्टी दूर सारुन हे आपल्या
डोळ्यांनी जगाला पाहा जरा