STORYMIRROR

manasvi poyamkar

Abstract Classics Others

5.0  

manasvi poyamkar

Abstract Classics Others

भेदलेले श्वास

भेदलेले श्वास

1 min
2.4K


द्वंद्व द्वंद्व पेटले

आज माझ्या अंतरी

आर्त हाक विरून जाते

श्वास भिडतो ऊरी

बोल सारे उडून जातात

हळुवार वाऱ्यावरि

अश्रुंचे नुसतेच बहाणे

हुंदक्यांची साथ आहे जरी

साठलेले अतरंगी

छेडतोस नजरेतूनी

छळूनी रोम रोम माझे

कटाक्ष भेदतात तरंगापरी

हलकेच गाफील राहणे

आकृष्ट घेऊन अंतरी

एकटीच आहे माझी

एकटी मी वाटेवरी

अश्रूतून दुःख वाहते

प्रीत राहते अधुरी

आर्त हाक विरून जाते

श्वास भेदतो उरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract