भावनांचा ओलावा
भावनांचा ओलावा
माझ्या घरातील बैठक अन
तुझ्या घरातील बैठक
खूप फरक आहे दोहोंत
तुझ्या घरातील बैठकीत
सुबक नक्षीदार सोफासेट
अन मलमलच्या गालिच्यासह
कुशनच्या महागड्या खुर्च्या
माझ्या घरातील बैठकीत
जुना लोखंडी पलंग
अन अंथरलेल्या जुनाट सतरंजीसह
जुन्याच फोल्डिंगच्या खुर्च्या
तुझ्या बैठकीतील उत्तम आरास
मला आकर्षित करते ,
मोहित करते
आता तूच सांग ,
तुला उमजेल का
माझ्या घरातील बैठकीतील
त्या जुनाट वस्तूंमध्ये
गुंतलेल्या
माझ्या भावनांचा ओलावा
