Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vishakha More

Inspirational

4.1  

Vishakha More

Inspirational

भाव मनीचे

भाव मनीचे

1 min
16.1K


सूर हे मनातले मनीच नाचू लागले

नवेच स्वप्न आज हे मनाशी बांधू लागले...

कळे मला न कळे तुला, जे प्रश्न मनी चालले

तेच तुझे शब्द जणू आज मला भावले


मनाचे मनाशी नाते कसे हे जुळले

तुझ्याच रंगी रंगले मी,माझे मला ना कळले...

न बोलताच भाव माझे कसे तुला समजले,

चेहरा वाचतोस का तू माझा, जे तुला सारेच उमगले...?


विचार कधीच नव्हता माझा तुला असे छळण्याचा,

पण का न जाणे होई हा बहाणा तुजसवे बोलण्याचा..

सांगायचे नसतानाही नकळत बोलून गेले मी,

वाटे जणू आता माझी न राहिले मी...


का होतसे भास मला मी एकटे असताना,

तुझेच स्वप्न येई मला जागेपणी अन निजताना...

न बोलता काहीच तू सांगत असतोस काहीतरी,

पण कळले जे मला तेच बोलशील का तू कधीतरी...?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational