भाव मनीचे
भाव मनीचे
भाव अनामिक
मम मनातील
किती उसळती
कैक दाटतील
हृदय कोंदणी
प्रीत सजवली
अव्यक्त भावना
ओठीच अडली
भेटता आपण
नजरानजरी
भाव मनातील
ते हृदयांतरी
कसे सांगू तुला
नाते हे प्रेमाचे
एकरुप होऊ
बंध रेशमाचे
जाणून घे नाथा
साथ दे मजला
हे गूज प्रीतीचे
कसे सांगू तुला!!
