भास छळतो काळजात
भास छळतो काळजात
मी स्वप्नाच्या दुनियेत
अंतरंगातील कल्पनेत
न्याहाळले मनसोक्त तुज
पण ते नुसतं भास होतं..
काल्पनिक भावनेतून
साकारली हृदयात मूर्ती
रूप गोजिरे अति सुंदर
जशी स्वर्गीय परीच येती..
जरी असले अदृश्य भास
सुखद अनुभूती होती खास
काय दिले होते आलिंगन
ओढ लागली खूप मनास..
जड जातो गं एकांतवास
तू कधी येशील साकारात
तुजविण मी खूप उदास
भास देतो गं त्रास मनात..
स्वपनागत मोहक परीला
कुठे शोधू व्यापक दुनियेत
विरह मज सोसवेना आता
भास तुझा छळतो काळजात..
