भारत
भारत


या जन्माचा नजराणा,
मायभूमीस पेश व्हावा....
तिरंगाच माझा,
गणवेश व्हावा....
सांडावे रुधीर,
या मातृभूमीसाठी...
हरेक जन्मी,
भारत माझा देश व्हावा....
स्वातंत्र्याच्या नभात उधळु चांदणे...
जाणीव करुनी प्रत्येक
कोरोना योद्ध्याची....
जाण ठेऊनी त्याची मनामनाने.....
रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा....
उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा....
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा..
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा...