STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

भारत माझा देश...!

भारत माझा देश...!

1 min
14.2K


सत्यमेव जयते ब्रीदाचा

आपला देश महान

विश्वात सर्वदूर ज्याची

एक वेगळीच शान...


बारा पगड जाती

अनेक धर्मांची खाण

तरीही साहिष्णुतेला

इथे नाही काही वाण..


मानवतेच्या कुशीत

वसते एकोप्याची जाण

एकदिलाने इथे नांदतो

लोकशाहीचा प्राण..


श्रद्धेची अन भक्तीची

आत्मिक गंगा वाहते महान

अंतरात वसते सदैव इथे

आपल्या देशाची जान..


मी महान माझा देश महान

गाऊ देशाचे गौरव गान

उन्नत उज्वल प्रगती करुनी

वाढवू देशाचा जगी सन्मान...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational