STORYMIRROR

Swapnita Amberkar

Inspirational Others

4  

Swapnita Amberkar

Inspirational Others

भारत देश महान

भारत देश महान

1 min
852

सोनेरी किरणांचा प्रखर हा भारत देश जगाची शान,

साऱ्या विश्वात शोभून दिसतो भारत देश महान ।।धृ।।


उंच हिमालये या माझ्या समृद्ध भारताची संप्पती,

तीन रंग माझ्या सोनेरी देशाच्या प्रगतीची ही गती.

ना जात ना धर्म ना कोणी मोठा नाही इथे लहान,

साऱ्या विश्वात शोभून दिसतो भारत देश महान ।।१।।


तिरंगा फडकतो नभी आहे देशाचे प्रतिक आमचे,

त्या स्वातंत्र्याचा नभात ते उधळू चांदणे आनंदाचे

माझा भारत देश करी माते स्त्रीत्वाचा या सन्मान ,

साऱ्या विश्वात शोभून दिसतो भारत देश महान ।।२।।


भारताच्या परंपरेचा, संस्कृतीचा अभिमान आहे,

भारत आमच्या या विरतेचे शानदार प्रतिक आहे.

जगाच्या या शिखरावर माझ्या देशाची उंच मान,

साऱ्या विश्वात शोभून दिसतो भारत देश महान ।।३।।


सुंदरतेचा अभिमान, मंदिराचा कळस परी हा देश,

पर्वताच्या उंच शिखरावर गाजे जगी हा जयघोष.

गंगा, ब्रम्हा या पवित्र नद्यांचा आम्हा हा अभिमान,

साऱ्या विश्वात शोभून दिसतो भारत देश महान ।।४।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational