जबाबदारी - एक न दिसणारं ओझं
जबाबदारी - एक न दिसणारं ओझं


घर सोडूनी जीव धावला कामासाठी,
डोळे जागे राहिले घराच्या सुखासाठी
जग बदलले पाहून मन ते दुखावले,
जबाबदारी घेऊनी क्षण ते सरले
जीवनाच्या सागरावर नाव ती हरली,
जबाबदारी घेता स्वप्ने सारी मागे उरली
आयुष्याचा बाण अचूक बसला मनावरी,
ओझं न घेता जबाबदारी आली खांद्यावरी
हसवता हसवता रडवले सुखाच्या स्पर्शाने,
जिंकताना मात्र हरले जबाबदारीच्या ओझ्याने
स्वप्नं राहिली आता सुखाच्या पल्याड दूर,
आयुष्याचा मेळ बसवताना जुळले नाही सुर
डोळ्यांत आता प्रश्नांचं अंधुक धुकं साचलं,
जबाबदारीचे ओझं घेता घेता आयुष्य हे संपलं