वेड वारीचे
वेड वारीचे
1 min
9
वारीचे लागले वेड मज
धावत आलो दरबारी,
विठ्ठल माझा पाही कर
ठेवूनी कटावरी.
आसमंती उंचावरी भिडला
वैष्णवांचा मेळा.
वारकरी सारे नाचती
होऊनी विठ्ठला भोवती गोळा.
भजनांची साथ घेऊनी
मृदुंग वाजे रिंगणी,
भजनी रंगात नाचती
सारे भक्तगण रंगूनी.
पाऊले पडती पंढरपूरीच्या
मखमली वाटेवरी,
विठूरायाला भेटण्यास आतुर
झाला वेडा वारकरी.
