शाळेतील मैत्रीचे बालपण
शाळेतील मैत्रीचे बालपण
मैत्री होती ती निखळ पहिल्या मैत्रीच्या प्रेमाची,
आयुष्यातील ती न विसरण्याऱ्या त्या क्षणांची.
उल्लड मस्ती करणारी ती भांडणे रोज व्हायची,
दिवसातून मात्र रोज आमची गट्टी फू असायची.
एक वेगळीच दुनिया होती त्या शाळेतील मैत्रीची,
शाळेच्या मागे झऱ्याची मज्जा होती ती पाण्याची.
शाळेच्या पटागणांत लाल पसरलेली ती फुले छान,
सराव करताना घरटं बांधाण्यासाठी तोडायचे ते रान.
आम्ही गं सहाजणी आमची शाळेची मैत्री होती न्यारी,
शाळेत होती ती एक आमची वेगळीच ती दुनियादारी.
रोज वाट पहायचो शनिवार येणाची त्या शाळेदिवसात,
मैफिल घरीच जमायची मग आमच्या त्या वेड्या मैत्रित.
खुप सुंदर आमचे अनमोल गोड क्षण ते छान होते,
मन सारे वेडे असे शाळेतील त्या मैत्रीत गुंतले होते.
आठवणी आठवले डोळे ते पाणावले त्या गोड साठवणीत,
दिवस खूप दूर राहिले त्या माझ्या शाळेतील मोह मैत्रीत .
