गुरुचा महिमा
गुरुचा महिमा
।। गुरु ज्ञानाचा कल्पवृक्ष विद्येचा अथांग सागर ।।
।। ज्ञान देणाऱ्या साऱ्या विश्वाचा असे परमेश्वर ।।
।। गुरु शिक्षणाचा महामेरु ज्ञानाची ती माऊली ।।
।। शिष्याच्या डोक्यावरची मायेची असे सावली।।
।। गुरु कृपा आहे तुमची ती आयुष्याची शिदोरी ।।
।। आम्ही पाहुनी तुम्हाला त्या देवतांच्या देव्हारी ।।
।। सुंदर तुमची ती मधुर गोड वाणी मन गुंग होई ।।
।। तुमची अनंत कीर्ती शिष्य साऱ्या विश्वात गाई ।।
।। ज्ञानाचे तुम्ही ते ज्ञानामृत असे आम्हा पाजले ।।
।। परमेश्वर रुपी या धरतीवरी ब्रम्हा ते अवतरले ।।
।। गुरुचा महिमा आहे आभाळाप्रमाणे तो विशाल ।।
।। ज्ञानरुपी हाती घेऊन शिक्षणाची तेजोमय मशाल ।।
।। गुरुविणा अपुरे आहे शिष्याचे सार्थकी जीवन ।।
।। शिष्याला घडवण्याचे गुरु देत असतो ते वचन ।।
।। गुरु ज्ञानाचा निर्झर मायेचा सुंदर तो पाझर ।।
।। ज्ञानरुपी माऊलीचा साऱ्या विश्वात तो गजर ।।
