आनंदाची दिवाळी
आनंदाची दिवाळी


रंगात रंगून गेले सारे रंग आनंदाचे,
दिवाळी साजरी करूनी जपू क्षण आनंदाचे
दिवा लावूनी दारी सजवू घरदार,
सुखाची तोरणे लावूनी येई कुटुंबात बहार
उजळून घर आपुले फुलांनी सजवूया,
मना मनाची नाती ती रेशमी धाग्यांनी विणूया
सण आनंदाचा आपल्या माणसांचा,
फराळाच्या गोडव्याने जपू आनंद जगण्याचा
लक्ष्मी येई घरी सुख नांदे दाहिदिशी,
मनाचे प्रेमळ पाखरू जणू उडे ते आकाशी