बाप्पा रूप तुझे साजिरे
बाप्पा रूप तुझे साजिरे
रुप साजिरे बाप्पा तुझे दिसे सुंदर ,
बसे तू देव्हारी उजळून जाई ते घर .
मुकुटाचा मणी चमकतो असा शिरी,
मनाला भुलवूनी येते ह्रदयी उभारी.
मोदकाचा प्रसाद खास तुझा नैवेद्य,
हसता तू मुखी दिसे रुप ते अभैद्य.
भाद्रपद चतुर्थीचा सण तुझा उत्साही,
मनी निर्मळतेची तू देतोस ग्वाही.
उमानंदन तू शोभतो परी धरतीवरी,
सुख आनंदाचे झाड लावूनी तू घरी.
बुद्धी देवता गणेशा तु सकळांचा,
पुत्र असे तू कैलासाच्या शंकराचा.
नमन करीतो आम्ही हे श्री लंबोदरा,
रुप दिसे परी तुझे चंद्रमा गौरीहरा.
