मंद गारवा
मंद गारवा
1 min
116
वाऱ्याची झुळूक आली अंगावरी,
हवेतील गारवा दाटला तो मनावरी.
चाहूल तुझी लागता शहारे ते येती,
थंडगार हवेवरती शिवार ते डोलती.
ऊन येता अन् क्षणात पडे ती सावली,
छोटे दवं ते पानवरती पडती सकाळी.
मंद गारवा आला बरसूनी तो प्रेमाचा,
हेमंत ऋतू आनंद देई साऱ्या क्षणाचा.
थंडीत मन सारे सैरभैर हवेत ते धावते,
क्षणाक्षणाला वाटे थंडी मज सावरते.
ऊन सावलीचा लपंडाव रोज तो चालतो,
हिवाळ्यात गारवा जणू अंगास बिलगतो.
