माझा भारत देश
माझा भारत देश
नभी फडकला तीन रंगांचा नजारा,
या भारतमातेचा हा शोभूनी किनारा.
वर केशरी शोभे तो ऐक्याचा हा रंग,
पाहूनी झाले या पाडुंरंग देव हे दंग.
तिरंगा सोनेरी इतिहासाच साक्षीदार,
भारतमातेच्या पुत्राला देऊनी आधार.
पांढरा रंग समृद्ध देश माझा भारत,
नाव गाजे माझ्या देशाचे या जगात
बलशाली भारत देश जगाची शान,
विश्वात शोभूनी तो भारत देश महान.
निळा चक्र फिरे सुदर्शना मधे ते परी,
तिरंगा आमचा फडकतो या जगावरी.
तीन रंग माझ्या सोनेरी देशाच्या प्रगती,
वाढवतो जवानाच्या कर्तुत्वाची ती गती.
हिरवा रंग शांत शोभे परी ध्वज शालुवरी,
तिरंगा भारतमातेचा पुजतो आम्ही देव्हारी.
नभी सजला हा तीन रंगाचा हा नजारा,
तिरंगा फडकताना येई अंगावरी शहारा.
जग करी सलाम या तिरंगा झेंडाला,
ऊभा राहतो न घाबरता त्या शञुला.
