आठवणींच्या हिंदोळ्यावर
आठवणींच्या हिंदोळ्यावर
अशीच एकटक नजरेनं पाहत होती,
जपलेल्या आठवणी न्याहाळत होती.
मन आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलू लागले,
आयुष्यातील आठवणींचे गुंते आता सुटू लागले.
पानाच्या दवांसारखे अलगद तरंग ते उठले,
आठवणींच्या सावलीत एकांतात दंग झाले.
मोरपंखी आठवणी मनाला स्पर्शून गेल्या,
साचलेल्या साऱ्या आठवणी जाग्या झाल्या.
अनमोल क्षणांची सोबत असलेल्या आठवणी,
मधुर सुरात रंगूनी जातात स्वरमय ती गाणी.
ओलं चिंब पावसात भिजवतात त्या आठवणी,
क्षणाक्षणाला भास पडूनी रडवतात त्या मनोमनी.
आठवणींच्या विश्वात जग हवेत जणू तरंगते,
भुतकाळाचे विश्व हे आठवणी आठवत रमते.
