भाकरी
भाकरी
माझा बाप शेतकरी
रातदिस श्रमकरी
उन्हातन्हात राबतो
माय त्याले साथकरी
माझ्या मायच्या हाताला
येगळीच चव न्यारी
जरी चटणी भाकरी
पोटभर खाती सारी
पहाटेच्या पारी माय
लगबग करोनिया
भाकरीची चवड करी
टोपलीत ठेवुनिया
सारी कामे करोनिया
देण्या धन्यास शिदोरी
जाई माय लगोलगी
ठेचा कांदा नि भाकरी
शेतामंधी येता पीक
दोघं पाहती सपान
भाकरी फुगावी तशी
फुलती हो त्यांची मन
