भाकरी
भाकरी
इथे एका भाकरीच्या तुकड्याची
गरिबांना मोजावी लागते किंमत
दिवसभर घाम गाळून रात्री उपाशी
झोपण्याची असते त्यांच्यात हिम्मत
घरदार राबत असत
पोटाची खळगी भरण्यासाठी
गरिबांना जगात कुणीच नसतं
डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी
पोटाची आग शमविण्यासाठी
मातीत सांडलेले दाने उचलले
निष्ठुर या जगाने त्या
गरिबालाही चोर समजले
इथे गरीब गरीबच राहतो
त्याला मिळत नाही भाकरी
जरी केली त्याने दिवसभर
या श्रीमंताघरची चाकरी
