STORYMIRROR

Chandan Pawar

Inspirational

3  

Chandan Pawar

Inspirational

भाग्यलक्ष्मी...

भाग्यलक्ष्मी...

1 min
298

फुलासम नाजूक सुंदर

सुकुमार जन्मावी एक परी..

गोड बोबडे बोल-छुमछुम

पैंजणांनी चैतन्य यावे घरी..


सुख-समृद्धीने, दैन्य-दारिद्र्य

निवारण होई तिच्या आगमनी..

भातुकलीच्या खेळातील राणी

बाललिलांनी आनंदी सकलजनी..


आई-बहीण-बायको-सून

नाना भूमिकांचा ती जागर..

सासर-माहेरचा ती गोडवा

अन सण-संस्कृतीचा आदर..


संकटनिवारणी आई जगदंबेचे

ती साक्षात रूप असे..

प्रेम-ममता-वात्सल्याच्या

तृष्णेसम नित्य भासे..


मुलगा वंशाचा कुलदीपक

तर मुलगी वंशाची तृप्ती..

लेक ईश्वराची सौंदर्यानुभूती

अंगी अलौकिक सृजनशक्ती..


मुलगी घराची “भाग्यलक्ष्मी”

निसर्गाचे अनुपम वरदान..

क्षितिजेही लिहिण्या अपूर्ण पडे

इतकी आहे ती गुणवान..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational