बदलता समाज
बदलता समाज
आज पण समाज हा विखुरलेला आहे
रुढी परंपरेने पोखरलेला आहे
इथे जर भारतीयच आहे सगळे
मग जातीधर्माने का केले हे वेगळे
पैसा आज इतका
मोठा कसा झाला
"माणूस" सोडून इथे
पूर्वग्रहदूषित प्राणी आला
याला दुसऱ्यांच्या भावनांची
मूळीच काही किंमत नाही
निरागस भावनेत, याच्या जिवनात
उरलेली गम्मत जम्मत नाही !!!
