STORYMIRROR

kishor zote

Inspirational

3  

kishor zote

Inspirational

बापु तुमच्या देशात

बापु तुमच्या देशात

1 min
13.9K



जात विचारली जाते
घेता प्रवेश शाळेत
तीच ओळख राहते
बापु तुमच्या देशात ॥१॥

पीका हमीभाव नाही
राजा कष्टतो शेतात
गळफास त्याचे गळी
बापु तुमच्या देशात ॥२॥

परिवर्तनाचे वारे
कोठे आता वाहतात ?
जाळपोळ सदा होते
बापु तुमच्या देशात ॥३॥

कुठे आहे समाधान
सारे फक्त धावतात
देव झाला धनवान
बापु तुमच्या देशात ॥४॥

खरा इतिहास जाण
नाही राहिली अशात

गोळ्या घेती पहा प्राण

बापु तुमच्या देशात ॥५॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational