॥ बाप्पाचे आगमन ॥
॥ बाप्पाचे आगमन ॥


दरवर्षी आतुरतेने वाट पहातो तुझी
सजवलेल्या मखरात येऊन बस, हौस पुरव माझी
लाडू, मोदक, खिरापत डब्यात ठेवली करून
प्रसाद खायला बोलावणे तुला घरांघरांतून
आगळंवेगळं रुप तुझे, तु घातले जानवं, पीत पीतांबर
केशरी टिळा भाली, सदोदित फुलांचा वर्षाव तुझ्यावर
गंगाजलाने घातले स्नान, ठेवला चौरंग, बस
भोळी भक्ती माझी, नको पाहू परीक्षेचा कस
कानात घातली भिकबाळी, ठेवला अत्तराचा फाया
पुजा माझी मनापासून, नाही जाणार वाया
तुझ्याबरोबर घरात गौरी येणार
पुरणपोळी खीर जेऊन लाड पुरवुन घेणार
हो प्रसन्न भक्तांवर, दे दर्शन सकल भक्तांना
आरती करता हजर होतो तु, सावरतो वाईट वक्ताला
तुझे मानावे कसे आभार, नाही समजत हे भरकटलेले वेडे मन
एक सत्य आहे खरे, तुझ्या आगमनाने साजरा होतो सण॥