STORYMIRROR

Raghu Deshpande

Inspirational

4  

Raghu Deshpande

Inspirational

बापाची समजावणी....!!

बापाची समजावणी....!!

1 min
324

बाळा....!

सगळच नसतं

सांगायच कुणाला

बसलेत टपूनं

गिधाडं गिळायला...!


कमजोरी जाणून

वर्मी वार करीती

मदतीच्या हाताने

ते पदर ओढतीं.....!


भोळे राहून आता

हे चालायचं नाय

सावधपणे बाई

तू वागायचं हाय.....!


कुणी नसतो वाली

दुर्बल घटकांचे

छोटा मासाच बनें

भक्ष मोठ्या मास्यांचे...!


कोळी विनतो जाळें

सावज तें घेरुन

आव आणतो असा

साव असे वरुन....!


होई शाप सुगंध

काय दोष फुलांचा

होई मृग शिकार

गुन्हा तो दिसण्याचा...!


सांग कुणी का कधी

कावळ्यास पाळलें

गोड गोड बोलणें

पोपटास भोवलें...!


झाकून ठेव उगा

तमाशा करु नको

आहे नाही ते सारे

जगासी दावू नको....!


कली महान झालां

पोर गळा घोटतें

जन्मदाती आईला

इहलोकी धाडतें....!


जन्मदात्या पित्याची

नजर वक्री होते

माणुसकीच्या मुखा

इथें काळें फासतें...!


सांभाळून आपलें

स्वत्व तुवा जपावें

यश किर्ती लाभोनी

मायबाप तोषावें.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational