STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

1.2  

Sunita Ghule

Inspirational

बाप

बाप

1 min
2.4K


अष्टाक्षरी


बाप/वडिल


मृदु हृदयीचा गरा

बाणा काटेरी फणस

व्यवहारी बाळकडू

बाप माझा गं परीस।


झिजविली त्यानं काया

उभा प्रपंच पेलतो

सुख दुःखामधी बाप

जणू दुष्काळ झेलतो।


कर्तृत्वात नाही कमी

त्याग बापाचा दिसेना

खांबापरी खंबीरता

आकाशात सामावेना।


फोडावानी जपुनिया

कन्यादान करी बाप

दाटलेल्या हुंदक्याचे

कसे लावायाचे माप।


अर्धपोटी उपाशीच

फक्त प्रेमाचा भूकेला

दिला मुखातला घास

माय सदैव साथीला।


पैका पैका जुळवून

लेका शिक्षणाचा वसा

मोठा साहेब होईल

अपेक्षेचा कवडसा।


गुणगान वात्सल्याचे

गाती लेकरे आईचे

दिपस्तंभ जीवनात

बाप तेल समईचे।


बाप पागोळयांचे पाणी

स्नेहमयी हे सिंचन

माय संसारात चूल

बाप तेजस्वी इंधन।


काटा रुतो ना पावला

वादळात छाती कोट

झेलुनिया तळहाती

सुखी करी पायवाट।


छ्त्र बापाचे हरपे

त्यास कळे काय पिता

झळ उन्हाची लागते

आधारच होतो रिता।


साथ मिळो जन्मभर

नसे जीवा घोर व्याप

आशीर्वाद डोईवरी

पाठी शाबासकी थाप।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational