बाप
बाप
आलं जरी मोठं वादळ डगमगू नको
हात तुझा मजबूत हाती आहे
भरून पंखात बळ घे भरारी
तुझा बाप तुझ्या पाठीशी आहे
घाव सोसून सगळे त्याने
भविष्य तुझे उज्वल केलं आहे
असा निःस्वार्थ प्रेमाचा झरा
तुझा बाप तुझ्या पाठीशी आहे
तुझ्या आनंदापुढे त्याला
सगळा स्वर्गही थिटा आहे
नशीब तुझ्या पायाशी लोळतंय
तुझा बाप तुझ्या पाठीशी आहे
गोड हास्यापुढे तुझ्या
त्याला माणिकमोतीही कवडिमोल आहे
काळजात दुःख लपवून उभा राहणारा
तुझा बाप तुझ्या पाठीशी आहे
रक्ताचं पाणी हाडाच काडं त्याने
फक्त तुझ्या सुखासाठी केलं आहे
सह्याद्रीच्या कड्यातल्या ढाण्यावाघ
तुझा बाप तुझ्या पाठीशी आहे
आले जरी हजारो सुपरहिरो
त्याची सर कोणाला जमणार आहे
तू आहेस साक्षात देवासोबत उभा कारण
तुझा बाप तुझ्या पाठीशी आहे
