STORYMIRROR

Pandit Warade

Classics

2  

Pandit Warade

Classics

बाप

बाप

1 min
14K


प्रेमस्वरूप हे रूप ईश्वरी आई माझ्यासाठी

बाप माझा लई कष्टला माझ्या भल्यासाठी


शेत कसाया राब राबतो ऊन पावसात

मोती पिकवतो घाम गाळुनी आपुल्या शेतात


बाप माझा काट्याकुट्यातून फिरे अनवाणी

घर चालवण्या रात्रंदिस करी रक्ताचे पाणी


स्वतःसाठी ना कधी खर्चतो खिशातून दमडी

बायको मुलांसाठी झिजवतो स्वतःची चामडी


चांगली शाळा, कॉलेज शोधतो मुलांच्यासाठी

फी, डोनेशन भरण्यासाठी राहे उपासपोटी


तऱ्हेतऱ्हेचे कपडे घेतसे बाप मुलांसाठी

फाटकेच परी धोतर, सदरा सदा स्वतःसाठी


तळहाताच्या फोडाप्रमाणे केले संगोपन

कन्यादान कन्येचे करतो बाप आनंदानं


पाठवता सासरी मुलीला आक्रंदून रडतो

"सांभाळा चिमणीला माझ्या" विनंती करतो


समजून घ्या बापाला मुलांनो, जरा मनोमनी

नका पाठवू वृद्धाश्रमात तुम्हा ही विनवणी



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics