STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Fantasy Others

3  

shubham gawade Jadhav

Fantasy Others

बाप

बाप

1 min
214

अंधाऱ्या कोपऱ्यात बसून

 बाप अश्रू मोकळे करत होता

 जबाबदारीच्या ओझ्याने थकलेला 

 बाप मात्र कोणच्याच लक्षात नव्हता


 विसरून स्वतःची स्वप्न सगळी

 जो फक्त मुलांच्या स्वप्नांसाठी झुरत होता

 क्षणोक्षणी मुलांना खुश ठेवाण्यासाठी

 कुढत असलेला बाप मात्र कोणाच्याच लक्षात नव्हता


स्वतः अडाणी राहून मुलाला शिकवण्यासाठी 

दिवसरात्र तो कष्टात खपत होता

रातरात जागून मुलांना शिक्षण देण्यासाठी

खपणारा बाप मात्र कोणाच्याच लक्षात नव्हता


मुलाच्या अंगावरती चांगले कपडे पाहून

खुश होणारा तो निरागस बाप होता

स्वतः फाटके कपडे घालूनही आनंदीत राहणारा

बाप मात्र कोणच्याच लक्षात नव्हता


हरवून उभ आयुष्य कष्टात सगळं

मुलांच्या जिंकण्याची वाट पाहत होता

आई एवढंच निःस्वार्थ प्रेम करणारा

बाप मात्र कोणाच्याच लक्षात नव्हता


लक्ष लक्ष संकटाना हसत सामोरं जाणारा

तो एक सुपरहिरोच होता

आयुष्याच्या खेळात पडद्यामाघे राहणारा

बाप मात्र कोणाच्याच लक्षात नव्हता 


आईवरचं प्रेम जसं जगजाहीर करता

तशाच प्रेमाला तोही पात्र होता पण 

 कुटुंबाची जबाबदारी वाहता वाहता

 दुर्लक्षित झालेला बाप मात्र कोणाच्याच लक्षात नव्हता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy