Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Tragedy Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Tragedy Inspirational

बाप माणूस

बाप माणूस

1 min
310


खंबीर मनाची आश्वासक हाक

अबोल - अबोल कौतुकाची थाप

आई असते घराच घरपण तर

बाप असतो चार भिंतीच समर्पण


आईच आईपण सर्वानाच जाणवत

पण बाप मात्र कायम दुर्लक्षितच

कारण आई व्यक्त होते सुख दुःखात

बाप हरकतो , रडतो आतल्या आत


आईचे गोडवे सर्वच गातात पण

बापाचं अव्यक्त प्रेम त्याच्या नजरेत

कुठे ,कोण शोधतो ? तो आईकडून

सर्व खबर घेतो, मदत करतो वेळोवेळी


आईच प्रेम वात्सल्य त्याग समर्पण निर्विवाद सत्य

पण मोठ्या संकटात मात्र आपल्याला बापच आठवतो

आई करते संगोपन, लाड,पुरविते हौस हमखास पण

 विसरू नये कधीच पडद्यामागचा सूत्रधार बाप माणूस 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy