बाप आणि मुलगी
बाप आणि मुलगी
बाप आणि मुलगी नातं फणसाच्या गऱ्यासारखं
बाप वरून काटेरी आतून गोड
मुलांना धाकात ठेवण्यासाठीहोतो कडक
पण तेच मुलीसाठी गोड गर।
बाप आपलं प्रेम बोलून दाखवत नाही
बापाचं प्रेम अबोल कळीसारखं।
त्याच्या कृतीतून उमटतं त्याचं प्रेम
पुर्वापार हे प्रेम वाटून घेतल्यासारखं
आईचं मुलावर बापाचं मुलीवर
खरं तर दोघांवर त्याचं तेवढंच प्रेम असतं
पण गमतीने असं विभाजन केलं जातं
मुलीसाठी तो वाट्टेल करायला तयार असतो
मुलीच्या हट्टाला सहसा तो नाही म्हणत नसतो
कारण, त्याला माहित असतं
मुलगी पाहुनी आहे,थोड्या दिवसासाठी त्याच्याकडं।
जरी ती पोटचा गोळा असली तरी
तिला पतिगृही पाठवावंच लागतं।
पोटात कितीही कालवाकालव झाली तरी
ते चेहऱ्यावर दाखवायचं नसतं
नाही तर त्याचं पिल्लुउदास होऊन बसायचं
मुलींचंही बापावर भारी प्रेम
पण आदरयुक्त।मनापासूनचं असतं ते प्रेम
आईची तक्रार बापाकडे करणार
आईला बाबा रागावले की खुश होणार
माहीत असतं तिला त्यांचं हे रागावणं खोटं खोटं असतं
पण तरीही तक्रार ती करतच राहणार
लेक चालली सासराला की
तो ढसा ढसा रडतो,
लेकीचा पाय उंबर्यातच अडतो
वळूनवळून ती मागे बघत असते
बापाचं छोटंसं रागावणंही तिला दुखावून जातं
आतल्याआत तिला विचार करायला लावतं
तिची चूक तिला उमजते, येऊन क्षमा मागते
त्या वेळी बाप,बाप रहात नाही
आई बनून जवळ घेतो,
,न बोलता मायेनं थोपटत रहातो
बापाचं अबोल, मुक प्रेम
पुन्हा पुन्हा एकमेकाकडे धावत राहतं।
दुरुन ती माऊली सारे पहात रहाते,बाप-लेकीच्या अनोख्या नात्याचा प्रेमबंध,
जो बरंच काही तिला सांगून जातो.
