बांध फुटला
बांध फुटला
किती दिवसांची ओढ लागली
आज कळेना काय करावे
कुठवर सांभाळू स्वतःला
किनार्यावर कुठवर तरावे
भावनांचा बाधं फूटला
अन् मनाचा ताबा सुटला
सामोरा तू आला एकांती
भासे सगळी मनःशांती
मिठीत शिरता विसरून सारे
भावनांचे उरी पेटले वारे
तव स्पर्शाची मी भूकेली
वाट पाहते कधी एकली
गालावरती श्वास ओला
काळजाने घात केला
मिटूनी पापण्या स्वार झाले अश्व
तुझ्या कुशीत दडले माझे विश्व

