बालपणातील मैत्री
बालपणातील मैत्री


उमलत्या वयातील अपुले मैत्रीचे नाते…
पन्नाशीच्या वयात अजूनही आनंदे गाणे गाते
उमलत्या वयातील अपुले मैत्रीचे नाते…
भेटून मैत्री जिव्हाळाने जपले
आठवणींनी कधीतरी टचकन डोळ्यात पाणी आणले
नव्हते तेव्हा दुःखाचे भरणारे जाते.......
होत शाळेत फक्त आनंदवाणीनी भरलेले भाते
जग आता उरी अनेक जखमा जरी देते
मैत्री त्यावरी मलमाचे काम करते......
समजून-उमजून जेव्हा मैत्रीची बाग फुलते.....
तेव्हाच पुन्हा खूपवर्षांनी पुन्हा आपली शाळा भरते