श्रावण
श्रावण

1 min

151
बेधुंद करी श्रावणातील गारवा
मनाला तनाला हवीहवीशी हवा
सृष्टीला ही भरला आहे एक नाद नवा
जन्म नाव सृष्टीस हवा
सूर लयीने ने साद घालतो, गात मारवा
हिरवाईचे मखमल न्याली वसुंधरा
पाठशिवणीचा खेळ खेळती धरा
माहेराला साद घालीती मुली आल्या
श्रावणात धरती न्याली शालू हिरवा
बेधुंद करी ही धुंद हवा श्रावण हिरवा
चहू दिशांना सांगावा धाडीत श्रावण आला
मनी सुखावला सृष्टीचा हा काला
श्रावण आला श्रावण आला
सृष्टीस एक नवा साज देऊन गेला....