श्रावणसर
श्रावणसर


मन ढगाळलेले असताना
अंतरी सोसाट्याचा वारा...
तरीही बरसत नाही मनातील
गोठलेल्या पाऊस धारा...
आतल्या जखमा आताशी
खपल्या धरू लागल्यात जरा...
पावसा मनास भिजवून आता
नको देऊस हृदयास चरा...
आठवणींना येता पूर
बरसतात डोळ्यातून अविरत धारा...
उलगडती सुख-दुःखाचे पट
तरळती आतल्या नजरेपुढे सरसरा...
असा हा वेल्हाळ पाऊस
चित्ताला करून जाई सैरभैर
मन कातरवेळी का होतं बावरं
त्याला सावरायला हवी एक श्रावणसर...
त्याला...
त्याला...