मनप्रिया
मनप्रिया


व्यापलेस तू अवघे विश्वची माझे
चंदनापरी झिजून सर्वस्व अर्पिलेस तुझे…
ज्ञानफुलांचा परिमळ दरवळे सर्वत्र तुझा
अभिमानने ऊर दाटून येतो तेव्हा माझा…..
कधी तप्त सौदामिनी तर कधी शीतल चांदणे तुझे
रात्रंदिन झिजूनहीं अलिप्त राहणे हेच वेगळेपण तुझे…..
परक्यांना तर हेवा आणि असूया वाटतेच तुझी
पण आप्त्यानाहीं सलतेय का प्रगती तुझी…..
निर्धार यशाचा आणी विद्या ग्रहणाचा तुझा
वाढतच राहू दे फडकू दे झेंडा विश्वात तुझा……
माझ्यासाठी तर फक्त अर्धांगिनीच नाहीच तू
तर माझे जीवन श्वासच आहेस तू……
हृदयात माझ्या खूपच खोलवर आहेस तू
आता माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत तूच आणि तू….
प्राणप्रिया, सखये माझे सारे जीवनच आहेस तू
जीवनच नाही तर जीवन श्वासच तू आणि तू….