Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Neha Sankhe

Others


3.3  

Neha Sankhe

Others


“ श्रावणसर ”

“ श्रावणसर ”

1 min 201 1 min 201

मन ढगाळलेले असताना

अंतरी सोसाट्याचा वारा.....

तरीही बरसत नाही मनातील

गोठलेल्या पाऊस धारा...

आतल्या जखमा आताशी

खपल्या धरू लागल्यात जरा...

पावसा मनास भिजवून आता

नको देऊस हृदयास चरा...

आठवणींना येता पूर

बरसतात डोळ्यातून अविरत धारा...

उलगडती सुखदुःखाचे पट

तरळती आतल्या नजरेपुढे सरसरा...

असा हा वेल्हाळ पाऊस

चित्ताला करून जाई सैरभैर

मन कातरवेळी का होतं बावर

त्याला सावरायला हवी एक श्रावणसर...

त्याला...


Rate this content
Log in