स्वार्थ
स्वार्थ
1 min
11.3K
स्वार्थाच्या धगधगत्या आगीच्या ज्वाला
होरपळून काढतायत मनातील अजाण बाळा...
लावला होता ज्यांनी एकेकाळी मनाला लळा
संधी मिळताच त्यांनीच कापला बेमालूमपणे गळा....
बुरखे फाटले टराटरा चेहरा उघडा पडला काळा
आघात आता स्वकीयांचे पचवू तरी किती वेळा..
जोपर्यंत समस्तरावर असतो तोपर्यंत खोट्या प्रेमाचा चाळा
प्रगतीपथावर लागताच तेच चढवू पाहतायात सुळा....
पुसूनच टाकतो आता गत आठवणींचा फळा
स्वानंदासाठी आता फुलवतोय आपल्याच मनाचा मळा......