"अंधार"
"अंधार"
1 min
360
हा अंधारलेला एकांताचा झाकोळ
मनात वेदनेचा अंगार फुलावतोय..
जुन्या जखमांच्या खपल्या काढून
आनंदी जीवनाचा यज्ञ विझवतोय.
सोशल मीडिया चा खोटा शब्दपूर
नात्यांची विणच हल्ली उसवतोय...
खोट्या भावनांच्या शब्द बंबाळ प्रवाहात
खोलवर रुजलेल्या नात्याना नासवतोय...
बुरखेधारी कपटी स्वार्थी जगात ह्या
मुखवट्यांचाच भाव वधारतोय..
