"राहून गेले"
"राहून गेले"


नजरेतूनही असे रोखून पाहू नकोस
अव्यक्त शब्द तुझे बोलायचे राहून गेले…..
बरसत आहे पाऊसधारा आता
अंतर्मनातून ही भिजायचे राहून गेले….
गाली तुझे गुलाब फुललेच असावेत
पाकळ्या तुझ्या ओठाच्या स्पर्शायाचे राहून गेले
जीवनी कातरवेळ सूर्यास्ताची आली ही
पण सकाळच्या कोवळ्या उन्हात हुंदडायचे राहून गेले….
सदैव अव्यक्त राहून काय साधतोस स्पष्टच सांगते
तु आवडतोस खुप हे सांगायचे राहुन गेले…..