बालिका वधू
बालिका वधू
आई म्हणाली पाया पड
झाला हा तुझा नवरा
मला तर वाटते बाई
हा नुसताच टवरा
मंगळसूत्र घालायला
मागतो बापाला पैसा
डोळे वटाळून बघतो
बांधला गळ्यात कैसा
आमचेच लाडू खाऊन
सारखा मला चिडवतो
प्रत्येक गोष्टीला जिद्द करतो
सासूबाईंचा पदर पकडतो
येऊ दे मला तुझ्या घरी
दाखवते चांगलाच इंगा
भाजीत सार मीठ टाकीन
घेऊ नको तू माझ्याशी पंगा
