STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

*बालगीत*

*बालगीत*

1 min
27.8K



दादा आला,दादा आला

चला लपूया ..

राज्य आहे त्याच्यावर

लपा बर लवकर,लवकर ......


राजा तू कपाटामागे

साई तू दारामागे

लपा लवकर लवकर...

राज्य आहे दादावर....



मनू तू काॅटखाली

सोनू तू सोफ्याखाली

लपा लवकर,लवकर

राज्य आहे दादावर.....


एक,दोन,तीन ,चार

दादा आला ,आला लवकर

लपा लपा रे भरभर

राज्य आहे दादावर.....


आला दादा आला

हालचाल सारी बंद करा

सापडू नका ह दादाला

लपा लपा चला चला


लागले कोण दादाच्या हाती

तर मजा भारी येईल साथी

धपका मिळेल पाठी

खेळ परत सुरू होती.....




साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational