Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Madhuri Dashpute

Abstract Children Stories Inspirational

4.0  

Madhuri Dashpute

Abstract Children Stories Inspirational

बालदिन

बालदिन

1 min
417


कशाला करता अहो बालदिन आमचा साजरा

त्या आधी स्वतःकडे एकदा खोलवर पहा जरा!


दीनवाणीच आहेत अजूनही कोवळी सुंदर फुले

एका घासासाठी अनवाणी अवखळ वाट त्यांची चाले!


कशाला हवी आहेत आमच्या बालमनावर

त्या नपुसंक विचारांची दाट छाया!


जिथे रचला जात आहे अजूनही जातीभेदांचा पाया!


माणूसच माणसाला मागे खेचतो आहे

चढाओढीच्या गर्दीत आपलाच स्वार्थ साधतो आहे!


गोड , मुलायम, मृदू भाषा तुमच्यात शिल्लक ठेवा

आम्हला फक्त मस्तकी तुमचा प्रेमळ हात हवा!


शिकू आम्ही सार काही तुमच्याचकडे पाहून

घडवू मग आदर्श पिढी तुमचंच दान लेवून!


एक दिवसाच्या बालदिनाने काही होणार नाही

नीच कुळातलं पोरग अश्याने उच्च होणार नाही!


समतेची शिकवण दया, आपल परकं सोडा

माणूस धर्म पाळा, विषमतेला तोडा!


देवाघरच्या सुंदर कळ्या उमलू दया छान

मुलगा मुलगी समानतेचा दया तिला मान!


प्रेमाची शिकवण दया, थांबवा बालअत्याचार

बालमजुरीला लगाम घाला शिक्षणाच पटवा सार!


सुंदर, नाजूक फुले आम्ही खेळू बागडू द्या छान

तेव्हाच तर खरा होईल बालदीनाचा सम्मान!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract