STORYMIRROR

Divya Sawant

Abstract Inspirational

4  

Divya Sawant

Abstract Inspirational

फौजीची बायको

फौजीची बायको

1 min
546

काय सांगू व्यथा जवानांच्या बायकांची

अशी ही काहाणी long distance रिलेशनची...

तो तिथे अन् ती इथे अशा या संघर्षाची

भर दिवसा भास व्हावेत अशा या प्रेमाची...

दोघाच्या प्रेमाला मोजता नाही येणार मापात

ती त्याच्या अन् तो देशाच्या फरक इतकाच त्यात...

कर्तव्य सोबतच पार पाडत असतात दोघे

तो देशाचे अन् ती त्यांच्या घराचे वाहतात ओझे...

फोनची सोय नसल्याने तो कधीतरी करतो फोन

वाट बघत काॅल ची ती रमवते कामात मन...

पप्पा कधी येणार विचारतात जेव्हा मुलं

देताना उत्तर ओघळतात दडलेली ती फुलं...

नटतात सनासुदीला जेव्हा तिच्या मैत्रिणी

चेहरा करते फीका आठवण त्याची मनी...

दुःख लपवून दोघेही मन मोठं करतात

आनंदात आहोत नेहमी असंच खोटं बोलतात...

गहीवरलेलं दुःख तिचं डोळ्यांत ही मावत नाही

शहीद जवानांच्या बातम्या ती पाहत नाही...

फुटलेला चुडा कोणाचा तिला ते पाहवत नाही

आकांत करते देवापुढे काळजी तिची संपत नाही...

अभिमान वाटतो तिला अश्या तिच्या जगण्यात

आनंद असे तिला फौजीची बायको आहे म्हणण्यात..

देशाच्या कर्तव्याची जाणीव तिला ही फार असते

ती सोबत नसल्याची उणीव त्यालाही खलत असते...

अशी त्यांची कथा शब्दात न मावणारी

शब्द संपले तरी व्यथा न संपणारी....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract