निशब्द
निशब्द
कोणती ही अवस्था बोचते आहे मनाला
निशब्द मी व्हावे वाटते पुन्हा जीवाला
काट्यांतूनही गुलाब छान फुलून यावा
चिखलातील कमळ पवित्र किती असावा
विचारांचा असा गोंधळ का उडावा
निशब्द मी व्हावे वाटते पुन्हा जीवाला
आकाशाचा अंत पाहीला कोणी आहे
समुद्राचा तळ उतरून कोण पाहे
वाकून कोणी पहावे वाटे आज मनाला
निशब्द मी व्हावे वाटते पुन्हा जीवाला
कोरड्या या मातीत पाऊस कोसळावा
चहूकडे मग त्याचा सुगंध दरवळावा
आनंदाचा क्षण हा उरात भरून रहावा
निशब्द मी व्हावे वाटते पुन्हा जीवाला
इंद्रधनुच्या त्या रंगात मी असे मिसळावे
विचारांचे तरंग माझ्या नेहमी शुद्ध असावे
सत्य माझे बोलणे रूतू नये कोणाला
निशब्द मी व्हावे वाटते पुन्हा जीवाला
शब्द गोठून जावेत भाव हे मनाचे
कोणास तरी कळावे निरागस मन माझे
कोणती ही अवस्था बोचते आहे मनाला
निशब्द मी व्हावे वाटते पुन्हा जीवाला.