Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Umesh Dhaske

Abstract

4  

Umesh Dhaske

Abstract

अभिषेक दूधाचा..!

अभिषेक दूधाचा..!

1 min
341


 ओतीले दगडावरी

 अभिषेकाच्या नावे दूध सारे

काय मिळवले सांगा ?

जाळूनी पोट तान्हयांचे ह्या रे...!


थरारले अंग पाहूनी

 लोट त्या दुधाचे

हंबरले बाळ त्या

दोन थेंबा वाचूनी अमृताचे....


दुध वाया घालवूनी कसली 

आंदोलने म्हणावी?

भूकेल्यांच्या पोटाची आतडी

का कुणी न जाणावी ?


सागर दुधाचा वाटेवरी

ओसांडूनी वाहिला

घाम घाळीत असणारा मी

बाप त्यात पाहिला......


दुधाने अंघोळी करुनी

काय सुटला प्रश्न हा ?

काय मायबाप हो तुम्हा

आठवला नाही तान्हा हा....?


पिंडीवरी दुधाचा झराच 

वाहत होता

कुणीतरी लडिवाळ आईचा

पान्हाच ओढत होता......!


माखल्या दुधाने देव 

शांत झाला का ?

माणसाने माणूसकी इथे तरी

दाखवली का ?.......


बुजगावण्यालाही आता

 दुधाचा अभिषेक होतो

कळवळणार्‍या जीवास 

आता दुधाचा फक्त वास येतो....!


थैमान पाहूनी दुधाचे

काळीजाची चिरफाड झाली

अश्रू जिच्या डोळ्यातूनी वाहिले

त्या माऊलीच्या डोळ्यांवरच मी पट्टी बांधली.......!


Rate this content
Log in