बाल गणेश
बाल गणेश
खर सांगू काल मला
आनंद खूपच झाला
आमच्या घरी सुंदर
गणपती बाप्पा आला
आईने केले तयार छान
बसायला सुंदर मखर
लाईट एवढे नको लावू
बाप्पा सांगत होता प्रखर
मग लावली छान समई
बाप्पा झाला खूश खूप
गोड गोड मोदक केले
पूजा,आरती लावला धूप
खूप खूप मजा करू बाप्पा
दहा दिवस राहणार आता
खेळायला ये ना माझ्यासंगे
तूच सर्वांचा बाप्पा आवडता
हात जोडून करतो प्रार्थना
सर्वांना सुखी ठेव ना बाप्पा
आई बाबांची काळजी घे
मग मारू दोघ छान गप्पा
