MAHENDRA SONEWANE

Inspirational


4  

MAHENDRA SONEWANE

Inspirational


बाबासाहेब

बाबासाहेब

1 min 216 1 min 216

घटनेचे शिल्पकार तुम्ही , 

उपेक्षितांचे उध्दारक होते ।

ज्ञानाचे सागर कायद्याने पंडित, 

भारतीयांचे अभिमान होते ।।


युग प्रवर्तक म्हणून झाले,

एक प्रचंड झंझावत होते ।

जन्मापासून संघर्षाची ,

कठोरतेने सुरुवात होते ।।


तुम्ही नव्हते तेव्हा समाज, 

अपमानित होत होते ।

तुमच्यामुळेच शोषित समाज ,

सन्मानीत झाले होते ।।


अन्याया विरुध्द लढायला,

शिकवून गेले होते ।

शिक्षणाचे महत्व सर्वाना ,

पटवून गेले होते ।।


अशिक्षितांनो शिक्षित व्हा ,

हे सांगून गेले होते ।

सन्मानाने जीणे शिकविले,

माणूस बनविले होते ।।


तुमच्या संदेशामुळेच ,

सर्व जागे झाले होते ।

शिकून संघटित झाले ,

संघर्ष कराया लागले होते ।।


हजारो संकटाना मात करत,

तुम्ही झुकले नव्हते ।

म्हणून तर तुमच्या सारखे,

कोणी शिकले नव्हते ।।


तुमचे शिक्षण पाहून ,

लोकांचे डोळे दिपले होते ।

या पृथ्वीवर सारा जग ,

तुम्हाला वंदन करीत होते ।।


समाजाला समान संधीचे ,

स्थान दिले आहे ।

जगण्यासाठी मानवतेचे ,

धर्म दिले आहे ।।


जाती जातीचा व्देष संपवून ,

देश बुध्दमय झाले आहे ।

तुम्ही लिहिलेल्या संविधानाला , 

जगभरात गौरव होत आहे ।।


Rate this content
Log in

More marathi poem from MAHENDRA SONEWANE

Similar marathi poem from Inspirational