बाबाचा दिवस....
बाबाचा दिवस....
- बाबा!!! बाबाचा असा खास दिवस नसतो. कारण तो रात्र दिवस फक्त झगडत असतो.मुंलाची स्वप्न भविष्य आनंद उत्साह खरेदी करण्यासाठी घाम विकत असतो...............
- बाबा!! ज्याचे सुख दुःख,विचार, भावना, वेदना, संवेदना,हास्य नी अश्रू मुलांसोबत भटकत असतात.....................
- बाबा! जरी असेल गरीब प्रेमाची मायेची श्रीमंती ऊधळत असतो. परी, नि राजा, म्हणताना, तो काटेरी पायवाटेवर चालुन फुंलाच्या पायघड्या अपत्यांसाठी घालित असतो........... ...........
- बाबा! ऑफिसात बाॅस असेल मोठा.चार चौघांमध्ये साहेबाचा मान असेल.मात्र पाठीवर बसवुन चिमुकल्याला घरभर रांगत असतो हटट लाड पुरवताना, बोबडे बोल बोलत असतो.....................
- बाबा! नेहमीच बोलुन वा डोळे पाझरून व्यक्त होत नाही. कुटूंब प्रमुखाची जबाबदारी, त्याच्या कणखर पुरुषत्वाची ग्वाही नी आभाळ मजबुत आहे तुमचं!हा विश्वास त्याला सार्थ करायचा असतो.....................
- बाबा! चिमुकलयाचा हिरो असतो तारुण्याचा मित्र असतो.कुरवाळीत तो सहसा नाही मात्र पाठीवर हलकासा हात ठेऊन डोळयाने खुप काही बोलून जातो. ..............
- बाबा! तो गरीब वा श्रीमंत यापेक्षा,लेंकरासाठी बाप नावाच आभाळ कायम असावं.त्या आभाळात, बिनधास्त,बेफिकीर, मनसोक्त, निवांत विहार करता येइल आपल्याच मस्तीत धुंद जगता येईल........................नी
- बाबा! कवेत घेइल पंखांना बळ देत राहील.
