अठ्ठावीस एप्रिल(28)
अठ्ठावीस एप्रिल(28)
किती छोट्या छोट्या गोष्टींने
आपण आनंदित होतो
याचे मला खूप नवल वाटते
वाटले जणू डोळ्यांचे पारणे फिटले....!
शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान
म्हणजे नेमके काय ..? तर इतरांसाठी साठी
ब्याद गेली म्हणून शुभ मंगल आणि
आपल्यासाठी सावधानतेचा इशारा...!
हे अक्षता पडल्या की प्रेमा सारखं
प्रेम प्रेम असत, प्रत्येकाच सेम असतं
खणपटीला सासऱ्याची फुली जणू
घरोघरी मातीच्या चुली सारख असतं....!
पण आज बाजू छान पलटली
जायफळाने बाबा बाजी मारली
यादी नुसार मसाल्याचे साहित्य आले
जायफळाने आपले रंग दाखवले....!
कदाचित जयफळाला सुयोगाने
माझी दया आली असावी
त्यालाही संसाराची झळ जणू
भर उन्हाळ्यात लागली असावी...
सांडगे पापड कुरडया सारे कसे
साबुदाण्या पासून बटाट्या पर्यन्त पार पडले
गोड्या मसाल्याचे फर्मान निघता
आज मोठे नवल घरी घडले....
जायफळ वळचणीस जाऊन बसता
गृहलक्ष्मीला मोकळे रान मिळाले
तेंव्हा मात्र शंख बिगुलासह युद्ध पेटले
माझ्या तोंडचे बाबांनो पाणी पळाले....
एक काम धड कराल तर शपथ पासून ते
ह्याचं हे नेहमीचंच असतं म्हणून शब्द थांबले
मलाही ते सारे गरम चहा बरोबर
खारिबिस्किट नसल्या सारखे झोंबले...!
यादी काढली टिकमार्क पाहिले
पाच जायफळाचे पन्नास रुपये दिसले
म्हंटले आता काही धडगत नाही
शोधा म्हणजे सापडेल शिवाय पर्याय नाही...
आणि काय आश्चर्य युरेका युरेका झाले
जायफळाचे पुडके डब्यातच दिसले
हाती शब्दांचे शस्त्र घेतले आणि
बघता बघता कबूल कबूल वदवून घेतले...!
आनंद मोठ्ठा ब्रम्हांड जिंकल्याचा झाला
पुत्र असावा ऐसा गुंडा त्रिलोकी झेंडा आठवले
हरण्याचे भाव चेहऱ्यावरचे सारे मी मग
लीलया डोळ्यात प्रेमाने साठवले....!
दुसऱ्या लॉक डावूनच्या तेराव्या दिवशी
लढाई मोठ्ठ्या जिद्दीने जिंकली
म्हंटले सुखी जीवनासाठी असावी
पाच दिवसाच्या आठवड्याच्या ड्युटीला
लॉक डावूनची पाळी दोन दिवसाची
यापुढे सदैव असावी विकली.......!
